Tuesday, January 18, 2011

आपल्यालाही आवडल असत...

आपल्यालाही आवडल असत...

रोज तीला चौपाटिवर फिरवायला..
तीच्या निळ्या डोळ्यात स्वतःला हरवायला..
वाळुत बंगला बांधता बांधता..
आल असत सांगता..

पण जाऊ दे जमलच नाही....

आपलयालाही आवडल असत ...
कधीतरी तीच्यासोबत बागेमध्ये जायला..
एकच केडबरी दोघांमध्ये वाटुन घ्यायला..
कधि खोडी काढली असती..
कधि गोडी वाढली असती..

पण जाऊ दे जमलच नाही....
आपलयालाही आवडल असत ...

तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला..
लता-रफी, किशोर-आशा ड्युएट गाणे गायला..
सुर कदाचीत जुळले असते..
तीच्या मनातले कळले असते..

पण जाऊ दे जमलच नाही....
आपलयालाही आवडल असत ...
निघता निघता तिला बावरलेलं पहायला..
मला तिची, तिला माझी शपथ घ्यायला..
माझे अश्रु डोळ्यतच लपले असते..
तीचे मात्र दवासारखे जपले असते..

पण जाऊ दे जमलच नाही...........

No comments:

Post a Comment