Sunday, January 30, 2011

prem....

वार्यावर उडणारी बटं सावरताना
खुप छान दिसायचीस तु,
तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.

नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
खरचं भासायची तु,
मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग आल्यावर,
कुठेच नसायची तु..

माझ्यावरच हसुन झाल्यावर" माझे"
पुन्हा मला दिसायची तु,
मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु...

No comments:

Post a Comment