Hiii Everyone.. Here you will find my selected posts.. Most of them written by me and some by others also.. So keep in touch to see new posts..
Tuesday, September 27, 2011
येइल का गं तुला माझी आठवण ?
येइल का गं तुला माझी आठवण ? मी दूर गेल्यानंतर होइल का गं पापणी ओली? जुनं सारं आठवल्यानंत र भासेल का एखादी संध्याकाळ उदास एकाकी नकोशी. अन् पाहून त्या वेड्या चन्द्रास आठवेल का रात्र जागवलेली? विचारलं मी काहीसं हळवं होत अन् धरला तुझा हात अगदी घटट् तू टाकलास एक शांत कटाक्ष आणि वार्यावरती गंध पसरावा इतक्या हळूवारपणे बोललीस . . . .. . . . . . वेड्या आठवण येण्यासाठी विसरावं लागतं !!!!
एका लहान मुलाची कळवळ
लहान मुलं कधी काय विचारतील! याचा नेम नसतो, आणि त्याचं ऊत्तर आपल्याजवळ नसते असतात फक्त पाणावलेले डोळे!!!! एका लहान मुलाची कळवळ!!!... ...... बाबा सांग ना रे आई कुठे गेली ती स्विटी म्हणे तुझी आई देवाघरी गेली तिच्याकडे कशी आई आहे माझी आई कुठे गेली? बाबा सकाळी मला रडायला येतं माझ्या स्वप्नात कोणतरी येतं झोप बाळं हं प्रेमानं म्हणतं ती आईच होती अगदी तुझ्या समोरुन गेली तु थांबवलच नाही बाबा माझी आई कुठे गेली मला शाळेत कोण नेणार? मला खाऊ कोण देणार? घरी आलास, की तु झोपुन जातो हां रे तु तर थकलेला असतो तु झोपल्यावर माझ्याशी लपाछपी कोण खेळणार? खेळायला मी माझ्याशीच गट्टी केली सांग ना रे बाबा माझी आई कुठे गेली? काल मी शाळेत पडलो एकटाच खुप रडलो मीच माझे डोळे पुसले अन् स्वतःलाच बडबडलो आई असती तर तिनं उचललं असतं मी पडायला लागलो की पकडलं असतं माझे डोळे पण पुसले असते मायेनं जवळ घेतलं असतं रोज मला तिची आठवण आली सांग ना रे बाबा माझी आई कुठे गेली काल स्विटि मला रागावून म्हणाली आहे तुझी आई तर मरुन गेली आहे बाबा मरणं म्हणजे काय असतं? त्यानं आई मिळेल का? मला सुद्धा जमलं असतं मरुन आईची नक्की भेट झाली असती? मी बर्थ डे ला हीच wish मागितली असती बाबा संगळ काही दिलं तुम्ही ही wish पुर्ण नाही केली सांग ना रे बाबा माझी आई कुठे गेली..
का बरं मला तुझी आठवण यावी...?
का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी.... ?
सारं काही जवळ असुनही,
दूर असल्याची जाणीव व्हावी.... .?
आठवतेय तो सारा पसारा,
जो पसरलाय सैरावैरा,
त्यातूनच तुझा तो इशारा,
तेव्हा अंगावर आलेला शहारा...,
वाटतं ही वेळ अशी, चुटकित सरून जावी,
आणि शेवटी कायमची, आपली गाठभेट व्हावी.... ...!
"जरा ऐक ना, काहीसांगाय चे आहे तुला...... . ♥,
♥"जरा ऐक ना, काहीसांगाय चे आहे तुला...... . ♥, तुला भेटताना... .... होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला, तुला पाहताना... ....... हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला, तुझ्या बरोबर चालताना... ........ हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला, तू सोबत असताना.... ... सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला, ... तू नसताना.... ....... तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला, तुज्या बरोबर बोलताना... ...... होणारी शब्दांची धडपड ऐकवायची आहे तुला, तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा...... .. हे सांगायचे आहे तुला, तुझ्या बद्दल माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत तुला...... ...प्रेमात ील नाजूक भावना
Asach rahu de aapale nate..
असंच राहू दे ना आपलं नातं त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया; आहोत ना एकमेकांसाठ ी खास मग एकमेकांना घाव नको देऊया! ... द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू, कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल हृदयामध्ये थोडी अशी जागा - जीवनाच्या वाटेवर दमलो कधी, तुझ्या सोबतीने बसता येईल पण ज्या छळतील आपल्याला अशा आठवणींचा गाव नको देऊया, असंच राहू दे ना आपलं नातं , त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!! प्रेमात नेहमी दुःखच असते . मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाउया प्रेम आहे न दोघात हे आपल्या नजरेला कळू दे ना असंच राहू दे ना आपलं नातं त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!
Chandani..
आकाशातील एक चांदणी आकाशातच हरवली चमकायच सोडुन ती आज गप्प-गप्प बसली निघाली होती ती चंद्राला शोधाया पण लागला तिला एकांत गाठाया ... फसवा चंद्र, गेला तिला एकटीला टाकुन लगेच येतो, अस खोटच सांगुन चांदणीच्या विश्वात एकच चंद्र असतो पण चंद्रा विश्वात मात्र चांदण्यांच ा भरला बाजार असतो निसर्गाचा हा नियम ती विसरुन गेली चंद्राला शोधता-शोधत ा जगापासुन खुप दुरवर गेली.
Muli..
कधी कोणी समजू शकतो का या मुलींना? समजून सगळे नासमज बनतात मुली चांगल्या चांगल्या मुलांना वेडयात काढतात या मुली अनोलखी पुरुषाला दादा – भैय्या म्हणतात या मुली , पण आपल्याच वडलान्ना काका का म्हणतात या मुली , बोलायला गेलो तर लाइन मारतोय म्हणतात या मुली, मग नाहीच बोललो की शाइन मारतोय का म्हणतात या मुली? मुद्द्याच बोलण थोड़च असत तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली, जेव्हा खरज बोलण्याची गरज असते …. तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ? पावसात भिजायच तर असत तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ? थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!! मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ?? वाचून ही कविता चान्ग्ल्या च भडकतिल या मुली !!!!! मग (कदाचित) विचार करून मनात… थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली
Subscribe to:
Posts (Atom)