Tuesday, September 27, 2011

एका लहान मुलाची कळवळ

लहान मुलं कधी काय विचारतील! याचा नेम नसतो, आणि त्याचं ऊत्तर आपल्याजवळ नसते असतात फक्त पाणावलेले डोळे!!!! एका लहान मुलाची कळवळ!!!... ...... बाबा सांग ना रे आई कुठे गेली ती स्विटी म्हणे तुझी आई देवाघरी गेली तिच्याकडे कशी आई आहे माझी आई कुठे गेली? बाबा सकाळी मला रडायला येतं माझ्या स्वप्नात कोणतरी येतं झोप बाळं हं प्रेमानं म्हणतं ती आईच होती अगदी तुझ्या समोरुन गेली तु थांबवलच नाही बाबा माझी आई कुठे गेली मला शाळेत कोण नेणार? मला खाऊ कोण देणार? घरी आलास, की तु झोपुन जातो हां रे तु तर थकलेला असतो तु झोपल्यावर माझ्याशी लपाछपी कोण खेळणार? खेळायला मी माझ्याशीच गट्टी केली सांग ना रे बाबा माझी आई कुठे गेली? काल मी शाळेत पडलो एकटाच खुप रडलो मीच माझे डोळे पुसले अन् स्वतःलाच बडबडलो आई असती तर तिनं उचललं असतं मी पडायला लागलो की पकडलं असतं माझे डोळे पण पुसले असते मायेनं जवळ घेतलं असतं रोज मला तिची आठवण आली सांग ना रे बाबा माझी आई कुठे गेली काल स्विटि मला रागावून म्हणाली आहे तुझी आई तर मरुन गेली आहे बाबा मरणं म्हणजे काय असतं? त्यानं आई मिळेल का? मला सुद्धा जमलं असतं मरुन आईची नक्की भेट झाली असती? मी बर्थ डे ला हीच wish मागितली असती बाबा संगळ काही दिलं तुम्ही ही wish पुर्ण नाही केली सांग ना रे बाबा माझी आई कुठे गेली..

No comments:

Post a Comment