Wednesday, October 5, 2011

" आज आईचा फोन आला होता.... . आज आईचा फोन आला होता कधी येतोयस बेटा तो हळवा आवाज पुन्हा पुन्हा विचारत होता थकलेत रे डोळे आज आता तुझी वाट पाहून पाहून तुला न भेटताच हा जीव जाऊ नये वाहून तुझे बाबा पण आज मनातून तुटत आहेत पण मी मजबूत आहे असे दाखवण्याचा खोटाच प्रयत्न ते करत आहेत तुझी ताई पण तू येणा-या वाटेकडेच पाहतेय तुझा दादा येईल का तुझ्यासाठी घेतलेली राखी सुद्धा तिला विचारतेय सतत बडबडणारा तुझा भाऊ आता अबोलच असतो आई कधी येईल ग दादा अश्रुने डबडबलेला त्याचा डोळा मला विचारत असतो यांचे जाऊ दे,पण तिचे काय जिला तू वचन दिलं आहेस प्रत्येक सुख दुखात साथ देण्याचे दुखांना पळवून सुख तिच्या जीवनात भरण्याचे तिचे ओठ अबोल असले तरी तिच्या झुकलेल्या नजरा प्रश्नानाचा वर्षाव करतात आई कधी येतील हो ते नकळत च मला पुन्हा पुन्हा सवाल करतात किती कारणे सांगू तिला तुझ्या न येण्याची बघ पक्षी सुद्धा आपापल्या घरट्यात येत आहेत कारण आता वेळ आली आहे रे बेटा सर्वांच्या मिलनाची ही हाक आहे माझ्या त्या प्रत्येक हळव्या मातेची सर्व जगाचे प्रेम,माया,सुगं ध सामावलेल्या त्या प्रत्येक नाजूक आणि सुंदर फुलांची!!

No comments:

Post a Comment