Wednesday, September 29, 2010

या कवितेतला कवि,
हरवुन बसलाय स्वत;ला,
का कागदावर शाई झिरपतेय ,
याची जाण ना त्या प्रेयसीला..

नक्षत्रांच्या चांदण्याभोवती,
हिंडवतोय तो तीला,
दुहेरी वाटेवर एकटा चालतांना,
वाइट वाटे फार त्याला.....

आयुष्याचे ओझे वाहत,
सावरतोय तो स्वत;ला,
अभ्यासाचे ओझे घेवून,
रमवतेय ती ही स्व;ताला..

त्याच्या जीवनात चाललाय,
सुख दुखाचा पाठशिवणीचा खेळ,
सुख हरिण पावलांनी जातात,
तर दुःखाला आहे कासवाचा वेग....

Sunday, September 26, 2010

बहरतेस अगदि रुतुसारखि,
ग्रीश्मालाहि लाजवेल इतकि तु छान,
पावसाचा ओलावा तुझ्यात पार,
तळपत्या सुर्यासारखी रागिटही फार

ओठाची भाषा नयनाने ओळखावी,
इतके तुझ्यात सामर्थ्य,
मी तर आहे खुळा सये,
ते कळण्यास अगदि असमर्थ

वाटते अस्तित्वाला विसरुन,
स्वप्नाच्या दुनियेत रमावे,
घेवुन जावे तुला नभापार,
अन् प्रुथ्वीची प्रदक्षिणा घालावे

पण ठाउक आहे मला,
फक्त प्रेमाने जगता येत नाहि,
तु नसल्याने सये
घराला घरपण येत नाहि,

चंद्र सुर्याची सोबत,
आणि तुझाच हात माझ्या हातात,
तो दिवस कधी उजाडेल,
याचाच विचार माझ्या मनात...

Friday, September 24, 2010

Charoli

प्रेमाचे गणित सोड़वण्यासाठि,
आम्हि दोघेहि सारखा प्रयत्न करित होतो,
फरक फक्त इतका,
मी बेरजेची जुळवा जुळव करत होतो,
आणि ती वजाबाकिची....