या कवितेतला कवि,
हरवुन बसलाय स्वत;ला,
का कागदावर शाई झिरपतेय ,
याची जाण ना त्या प्रेयसीला..
नक्षत्रांच्या चांदण्याभोवती,
हिंडवतोय तो तीला,
दुहेरी वाटेवर एकटा चालतांना,
वाइट वाटे फार त्याला.....
आयुष्याचे ओझे वाहत,
सावरतोय तो स्वत;ला,
अभ्यासाचे ओझे घेवून,
रमवतेय ती ही स्व;ताला..
त्याच्या जीवनात चाललाय,
सुख दुखाचा पाठशिवणीचा खेळ,
सुख हरिण पावलांनी जातात,
तर दुःखाला आहे कासवाचा वेग....
No comments:
Post a Comment