आयुश्याच्या सुंदर वळणावरती,
अप्रतिम वेळ ही यावी,
मन माझे असते कुठे,
याची जाणिव मज व्हावी...
असेन ती अभ्यासात रमलेली,
वाढेन माझाही कामाचा व्याप,
या अभ्यास आणि कामाच्या भानगडीतही,
असावी प्रिती एकमेकांच्या मनी अमाप..
अचानक तीने म्हणावे कंटाळले मी अभ्यासाला,
माझ्याही ओठी यावे बस्स झाले काम,
जावे आम्ही हींडायला अन्
करावा आम्ही बागेतच आराम...
मी बोलु कि ती बोलेन याची वाट पाहत,
निघुन जाइन दुपारची वेळ,
नजरेला नजर भिडवत सये,
येइल मग गार गार सांज वेळ...
व्हाव्यात आपल्या रोजच भेटिगाठि,
होतीलही यात काही नवल नाही,
पण अचानक एकदा ह्रुदयाची भावना नयनांव्दारे बाहेर यावी,
पापण्या दोघांच्या थरकाव्यात अन् प्रेमाची प्रचिती आपणास व्हावी....
-विक्कि
No comments:
Post a Comment