बहरतेस अगदि रुतुसारखि,
ग्रीश्मालाहि लाजवेल इतकि तु छान,
पावसाचा ओलावा तुझ्यात पार,
तळपत्या सुर्यासारखी रागिटही फार
ओठाची भाषा नयनाने ओळखावी,
इतके तुझ्यात सामर्थ्य,
मी तर आहे खुळा सये,
ते कळण्यास अगदि असमर्थ
वाटते अस्तित्वाला विसरुन,
स्वप्नाच्या दुनियेत रमावे,
घेवुन जावे तुला नभापार,
अन् प्रुथ्वीची प्रदक्षिणा घालावे
पण ठाउक आहे मला,
फक्त प्रेमाने जगता येत नाहि,
तु नसल्याने सये
घराला घरपण येत नाहि,
चंद्र सुर्याची सोबत,
आणि तुझाच हात माझ्या हातात,
तो दिवस कधी उजाडेल,
याचाच विचार माझ्या मनात...
No comments:
Post a Comment