आभाळ कोसळले मजवर,
प्रेमाने खेळ कसा हा मांडला..
होते आनंदि आनंद चोहिकडे,
आता दुःखाने संसार हा थाटला..
अनावर झालेत अश्रु,
कोण समजावणार या नयनाला..
ह्रुदयाचे ठोकेही पडतात हळुवार,
कोण सावरणार याच्या वेगाला...
तुझ्या सोबत घालवलेली वेळ,
आठवतेय क्षणाक्षणाला..
येना परत प्रिये,
का सतावतेय तुझ्या प्रियकराला.....
- विक्कि
No comments:
Post a Comment