कटु अनुभव परत परत येतिल,
असे काही ठरलेले नसते..
जवळ येऊ पाहणारा व्यक्ति,
दुर गेलेल्यासारखाच असेल...
हा विचार करणं देखिल बरे नसते..
अनोळख्या व्यक्तिवर विश्वास ठेवणं,
तितकेसे सोपे नसते..
पण ओळखिचे होण्यासाठी,
बोलणे.. भेटणे.. गरजेचे असते..
दुसर्यांच्या भावनांचा आदर करणे,
आपणचं शिकायचे असते..
आपला अनादर होणार नाही,
याची काळजीदेखील स्वतःच घ्यायचे असते..
No comments:
Post a Comment