आहे जीवन रुसलेले,
पसरलाय सर्वत्र अंधार..
तु आलिस तर मिळेल,
मला माझ्या जगण्याचा आधार..
बरेच काही आहे जे तुला सांगायचेय,
मनातिल दुःख तुझ्यासमोरच मांडायचेय..
पण हे होण्यासाठी,
अवचित काही घडावे लागेल..
नकळत आपल्याला भेटावे लागेल...
तु समोर आलीस की,
अस काही घडेल..
माझ्यासकट सारं विश्व,
तुझ्यापुढे गहाण पडेल...
तुझा स्वभाव हा तुझ्या इतकाच सुंदर असल्याने,
मी तुझ्या सुंदर व्यक्तिमत्वाची सहजतेने कल्पना करतोय..
अनोळख्या (unknown) व्यक्तिला जवळ घेशील,
याची देवाकडे प्रार्थना करतोय.....
No comments:
Post a Comment