जगास अनोळख्या ठिकाणी,
आपण पहिल्यांदा भेटावे,
वार्याने उडणारे तुझे सुंदर केस,
मी अलगद हाताने सावरावे..
अनोळख्या जागी अनोळखे आपण,
अनोळखेपण विसरावे,
प्रेमाची देवाण घेवाण करुन,
तुच प्रिये मज पास घ्यावे...
तुझा अलगता हात हातात घेउन,
प्रेम स्पर्शाची जाण मज व्हावे,
अचानक पडेल वीज मग,
तुही मला बाहुपाशात घ्यावे...
प्रेमाचे हे रुप सुंदर,
आपणा दोघांनाही कळावे,
विरह अन् यातना..
यांचा स्पर्श देखील कधी न व्हावे..
मनातील भावना नयनांद्वारे,
आपण दोघांनीही ओळखावे..
काय करु प्रिये,
तुज विन् मज कुणि न् स्मरावे......
-विक्कि
No comments:
Post a Comment