Saturday, October 2, 2010

का छळतेस अशी मला,
कारण तरी सांग..
या अबोल्याचे रुपांतरित शब्द,
ओठि तरी आण...

ना मागील जन्माचे वैर आपले,
ना या जन्मी अजुन तरी गाठ..
संपवुन टाक दोघांमाधले अंतर,
भाव तुझ्या मनाचे माझ्या कानी तरी सांग..
का छळतेस अशी मला कारण तरी सांग..

असते हे जीवन सुंदर,
लुटावयाचा असतो आयुश्याचा प्रत्येक क्षण..
हे सुंदर क्षण लुटतांना हवा असतो सोबती..
तो सोबती मीच आहे हे मनापासुन सांग...
का छळतेस अशी मला कारण तरी सांग..

छान तो रंगीबेरंगी पक्ष्यांचा थवा,
तसाच रंग आपल्या जीवनाला हवा हवा..
पाखरेही भेटतात एकमेकांच्या ओढिने..
आपल्या अधुर्‍या प्रेमकहाणीला पुर्ण करशील ना सांग..
का छळतेस अशी मला कारण तरी सांग..

1 comment: