Hiii Everyone.. Here you will find my selected posts.. Most of them written by me and some by others also.. So keep in touch to see new posts..
Monday, January 31, 2011
Marathi Charolya....
अन् मी ही बोलत नाही
पण क्षण आठवांचे
गुणगुणतात काही.....
अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे...............
जीवन कसे पक्ष्यां सारखे असावे
कुठे ही उडावे आणि कसे ही जगावे
आणि मरताना देखिल कधी कुणावर
आपले ओजे न देता जावे
आठवणींच्या मागे धावलो
कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना,
परतायचं राहुन जातं.
जळुन तृप्त होतो गुलमोहर,
तरी पाउसाची भेट नाही.
गुलमोहराचं जळणं,
कधीच का पावसाला कळत नाही
पाय मुकेच चालतात,
परी मन आठवणींना ठेचाळते.
नजरे समोर गाव तुझे अंधुक,
अन ही वाट स्वप्नांकडे जाते.
आपली पहीली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेऊन गेली.
प्रेम म्हणजे काय…
हवा असलेला तिचा नि:शब्द सहवास,
नी, तिनं माळलेल्या गज-याचा
मी ऊर भरुन घेतलेला श्वास.
हिरवळीवर धावणारी पायवाट,
किती अस्मितेने वागते.
हिरवळ ओसरली की,
निपचीत पडुन पुन्हा वाट पाहते.
शब्द होऊ पाहणा-या भावनांची
जेव्हा गळ्यापर्यंत येऊनही कत्तल होते,
तेव्हा कुठे जाऊन
एक कविता जन्माला येते.
तुझा 'अनोळखी'पणा ही
आता ओळखीचा वाटायला लागला आहे.
अनोळखी 'तु' असलीस तरीही
तो माझ्या ओळखीचा झाला आहे.
तुझ्या आठवणींचा एक थेंब
नेहमी माझ्या डोळ्यांच्या कोप-यात असतो,
पानांवर दव चमकावे
तसे नजरेत माझ्या चमकतो.
खुणवीत आहे काही
तिळ तुझ्या गालावरचे,
मलाच समजत नाही
ते शब्दात कसे सांगायचे.
फुल कधी म्हणत नाही की
सुगंध नेहमी वा-यावरच फिरतो,
कारण, त्यालाही माहीत असतं
कितीही दुर गेला तरी तो फुलाचाच असतो.
पानांवर सठलेल्या थेंबासारखे
रंग मैत्रीचे,
रोजरोज भांडुण घट्ट होणारे
हे बंध मैत्रीचे.
असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…
कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.
पिकलेल्या पनाला
वा-याची तमा नसते.
म्हणुनच कदाचीत
ते जास्त सळसळते.
एकांताला सोबत घेऊन
समुद्र किना-यावरुन चालताना,
वाळुनेही जागा सोडावी पायाखालुन ?
लाट माझ्यापासुन ओसरताना…!!!
संध्याकाळची वेळ
सुर्य दमुन अस्ताकडे झुकलेला,
नि:शब्द सांगुन जातो
'उगवणार आहे मी पुन्हा एकदा मावळायला'
सगळंच बरोबर करताना
काही चुका करुन गेलो,
त्यात न विसरना-या व्यक्तीलाही
मी आज विसरुन गेलो,
आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.
आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.
माझ्या कविता-चारोळ्या म्हणजे,
माझ्या भावना, माझे अनुभव.
माझ्या मनाच्या पात्यावर साठलेले,
माझ्याच आठवणींचे दव.
माझ्या ओंजळीतुन
तुझ्या आठवणींची नेहमी पिसं मी उडवावी…
अलगद अशी उडुन ती,
पुन्हा माझ्याच पदरत पडावी…
माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं
थंडीचं एकदा
प्रेम जडलं पहाटेवर,
आजही ते एकत्र चालताना दिसतात
सकाळच्या वाटेवर.
ती वा-याची एक झुळुक
हळुच शेजारुन जाणारी,
जाता जाता पाहत वळुन
मंद गालातल्या गालात हसणारी.
दिवसागन श्वास नविन
श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!
कोमल तुझ्या चेहर-या वरुन
अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने
फ़ुलायचे हे डोळ्यांनाही न समजावे ?
तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
'नाजुक' शब्द सुद्दा जरा जड वाटतं.
कोणाची तरी ओढ लागली
की ओढाताण होतेच !
वणवा लागतो मनाला,
नि आयुष्याचे कोरडे रान होते...
प्रेम म्हणजे काय....
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही…
का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…
मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही…
रात्री छान च असतात … तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला…
प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्यात ते नेहमीच जपायाच असत…
प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही
आठवण...
हरवलेल्या स्वप्नांनारंग तुझा देउन जाते..
तुझ्या पैजणांची रुणझुणकानांमध्ये दाटुन येते,
मी मिटुन घेतो डोळे तेव्हातु मिठीत हळुवार भेटुन जाते...
स्वप्नांतले जगणे माझेवास्तवाचे भान सुटुन जाते,
मनात तुझ्या आठवांचेपुन्हा रान पेटुन येते....
तुझी आठवण येतानागंध तुझा घेउन येते..,
हरवलेल्या स्वप्नांनारंग तुझा... देउन जाते.....
Sunday, January 30, 2011
prem....
खुप छान दिसायचीस तु,
तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.
नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
खरचं भासायची तु,
मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग आल्यावर,
कुठेच नसायची तु..
माझ्यावरच हसुन झाल्यावर" माझे"
पुन्हा मला दिसायची तु,
मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु...
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे...
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा
फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे
तुझा तो सुंदर चेहरा
जणू जास्वंदी सोबत मोगरा
तुझे ते सोणेरी रूप
जसे साखरेत मुरलेले तुप
त्यातल प्रत्येक स्वाद
मलाच चाखायचा आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
तुझे ते लांब रेशमी केस
हलकेच हवेत उडत
तुला झुल्यात बसवण्यासाठी
मन माझे तडपडत
त्या स्वप्नाच्या झुल्यात
मला पण झुलायचे आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
तु जवळून माझ्या जाताना
येत असे सुगंधी वारा
मनात माझ्या बरसे
जणू पावसाच्या धारा
त्या सुगंधी पावसात
तुझ्याच बरोबर भिजायच आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा
फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
Tuesday, January 18, 2011
आपल्यालाही आवडल असत...
रोज तीला चौपाटिवर फिरवायला..
तीच्या निळ्या डोळ्यात स्वतःला हरवायला..
वाळुत बंगला बांधता बांधता..
आल असत सांगता..
पण जाऊ दे जमलच नाही....
आपलयालाही आवडल असत ...
कधीतरी तीच्यासोबत बागेमध्ये जायला..
एकच केडबरी दोघांमध्ये वाटुन घ्यायला..
कधि खोडी काढली असती..
कधि गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलच नाही....
आपलयालाही आवडल असत ...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला..
लता-रफी, किशोर-आशा ड्युएट गाणे गायला..
सुर कदाचीत जुळले असते..
तीच्या मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलच नाही....
आपलयालाही आवडल असत ...
निघता निघता तिला बावरलेलं पहायला..
मला तिची, तिला माझी शपथ घ्यायला..
माझे अश्रु डोळ्यतच लपले असते..
तीचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलच नाही...........
Saturday, January 8, 2011
हरवूनच जावं .. सोबत तिच्या..
तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं ..
तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं..
तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं .. सोबत तिच्या..
तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव .. अदांवर तिच्या..
तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या..
तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या..
तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..
तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..