Sunday, February 13, 2011

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात...

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतातकधी मेसेस मधून तर कधी इमेल मधून...एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात...एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही,समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही..जरा काही खट्टा झाला कि एकमेकांची काळजी करत बसतात.. कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतातपण आता पुर्वीसारख उठ सुठ ते एकमेकांना फोन करत नाहीत,जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही..मग फोन वर उगाचच ते शब्दांशी खेळत बसतात... जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतातत्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत.. आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत..तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये हळूच डोकावतात... जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतातती टेन्शन मध्ये असली कि तिचा पहिला फोन त्यालाच असतो..तोही सगळी कामे बाजूला सारून तिच्यासाठी हाजीर राहतो..कारण त्याला माहित असत..फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज कातर नसतो...त्याच्या इतकं जवळच अजूनही तीच कोणीच नसत ..मग जोडी दाराच्या नकळत ते एकमेकांना भेटतात.. कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतातत्याच्या साठी कधी कधी ती हि कासावीस होते...विसर विसर म्हणता म्हणता त्याचीच होऊन राहते..पण तिच्या भावना ती शब्दात कधीच मांडत नाही..आणि तो हि बोलताना तिच्या डोळ्यात कधीच बघत नाही..अस न बोलताच ते एकमेकांना खूप समजून घेतात.. जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतातदूर जाताना दिलेलं मैत्रीचं वचन ते अस नेहमीच पाळतात..आणि म्हणूनच आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात.....

No comments:

Post a Comment