"तुझ्या येण्याअगोदर एक पत्र"...
छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी फोर व्हीलर येऊ शकेल खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊलवाटच नाक धरून उकिर्ड्यातून वाट काढत खाली येते पुलावारून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेलीखुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगा-यासारखी दिसतील तुला मन आणि तोल सावरतखाली यावं लागेल खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड दारूच्या गुत्त्यावरील कोलमडणारे संवाद छक्केपंजे, बादशाहबेगमचे रोजचेच विवाद चार दोन शिव्याही तुझ्या कानी पडतील...कदाचित शरमू नकोस फाटक्या कपड्यांतील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतीलत्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचारतुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेलत्या मुलांच्या मागून तू ज्या वाटेनं येशील कदाचित त्या वाटेवर मागे चाळ गोळा होईलबिथरू नकोस जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डर्सच्या भल्याथोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानंमाझं घर उभारलेलं दिसेल माझ्या १० बाय १० च्या घरात येशील तेव्हा माझ्या भाबड्या आईचं गबाळं स्वागत बनियान टॉवेलातला मी आमची कण्हत-धुपत पेटणारी चूल काळा कुळकुळीत चहा आमचं ऑल इन वन घर.... हे सारंतुला किळसवाणं वाटल्याची खूण तुझ्या डोळ्यांत पाहूनमी स्वत:ची घृणा करण्यास विवश होईन तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे.तुझे 'डॅड' मला नवंकोरं भविष्य विकत घेऊन देतील हे ठिकय...पण मी माझी घृणा करेन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर माझ्या गरीबखान्यात येऊ नकोस शक्यतो तू रंगवलेली स्वप्नं इथल्या भूमीत अंकुरणार नाही...आणि मला बोन्साय होणं मान्य नाही तु तुझी स्वप्नबीजं घेऊन जाएक नवी सुपीक जमीन शोध माझ्या या वांझोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलचइथेही फुले फुलवतीलस्वप्न साकारतीलपण तोवरमला माझ्या स्वप्नांचं खत-पाणी करून मला स्वत:लाच गाडून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी..

No comments:
Post a Comment