तुझ्यातील माणूसपण , मी जोखले होते
क्षणही सुखाचे जरा, चाखले होते
चेहऱ्यात एका तुझ्या, चेहरे अनेक होते
लुटलो तरीही माझे, इरादे नेक होते
तुला सोसण्याचे, जडलेले छंद होते
मस्तीतले दुख्ख:ही. भलतेच धुंद होते
असणे माझे तुझ्यापरी. नसल्यासवेच होते
भोवती तुझ्या सारे , गुलछबु थवेच होते
तू आखलेले वर्तुळ, तुझ्यापुरते जग होते
डोळे पुसणारे तुझे, काहीजण ठग होते
चुकते मी केले ते, हिशेब चोख होते
काळाचे उत्तरही, त्यावर चोख होते
नावात तुझ्या आयुष्य, सामावले होते
पूर्वजही तेंव्हा माझे, दुखावले होते।