Wednesday, May 7, 2014

वेडीच आहे ती!

वेडीच आहे ती!
माझ्या जाण्याच्या दिवसाची वाट पाहतीये,
उरलेला प्रत्येक क्षणनक्षण माझ्यात जगायला,
वेडी कधी दिवसात तर कधी तासात वेळ मोजतीये,
वारंवार मला आठवण करून देतीये,
माहितीये मला ती तस का करतीये!

स्पष्टपणे न तीला काही बोलवेना न मला,
डोळ्यांना मात्र कळतंय सार,
नजरेतूनच चर्चा होते हल्ली आमच्यात!

तीच्या शिवाय जगण्याच्या विचाराने,
थरकाप उडालाय माझ्या मनाचा,
भावनांचाही कडेलोट झालाय केव्हाच,
क्षण हा येणार हे दोघांनाही होते माहित,
पण तरीही मन मात्र तयार होईना निघायला!

हातात हात घेउनी, नजरेला नजर भिडवूनी,
घेताना तीचा निरोप,
होणार माझे पानिपत!

पण,
जाताना देईल तीला मी भरवसा,
असलो जरी साता-समुद्रापार तरी राहील तुझ्या मनात,
तुझ्या प्रेमाची सावली, जाणवेल मला तिथेही,
आठवशील तू प्रत्येक श्वासाला,
जाणवेल तुलाही अस्तित्व माझ,
पापणी आपली लावताना!

तिथेच असेल मी तुझ्या मनात खोलवर रुजलेला,
जाणीव…….तू मनाने सोबत असल्याची पुरवून घेईल मी स्वतःला!

वेडे विश्वास ठेव!
तुझ्या शिवायचा हा प्रत्येक क्षणही,
फक्त तुझाच असेल,
असेल तुझ्याच प्रेमात तो बहरलेला!

वाट पहा!
लवकरच परतेन मी,
तुझ्या मिठीतला स्वर्ग जगायला!!!

No comments:

Post a Comment