Wednesday, March 15, 2017

एकदा का होईना....

एकदा का होईना मला तुला भेटायचय,
भाव माज़्या मनीचे तुला हळुवार पने सांगायचय।

एकदा का होईना पुन्हा लहानगे व्हायचंय,
तुज़्या वेदनांचे दप्तर माज़्या पाठीला लावायचय।

एकदा का होईना होळीच्या रंगात भिजायचय,
बेरंगी आयुष्याला इंद्रधनु परी रंगवायचय।

एकदा का होईना अश्रु संपे पर्यंत रडायचय,
वाटे कडे डोळे लावून दिवस रात्र जागायचय।

-विपुल शिंपी 

Wednesday, May 7, 2014

तुझ्यातील माणूसपण....

तुझ्यातील माणूसपण , मी जोखले होते
क्षणही सुखाचे जरा, चाखले होते

चेहऱ्यात एका तुझ्या, चेहरे अनेक होते
लुटलो तरीही माझे, इरादे नेक होते

तुला सोसण्याचे, जडलेले छंद होते
मस्तीतले दुख्ख:ही. भलतेच धुंद होते

असणे माझे तुझ्यापरी. नसल्यासवेच होते
भोवती तुझ्या सारे , गुलछबु थवेच होते

तू आखलेले वर्तुळ, तुझ्यापुरते जग होते
डोळे पुसणारे तुझे, काहीजण ठग होते

चुकते मी केले ते, हिशेब चोख होते
काळाचे उत्तरही, त्यावर चोख होते

नावात तुझ्या आयुष्य, सामावले होते
पूर्वजही तेंव्हा माझे, दुखावले होते। 

माणूस......

माणूस

माणसांच्यागरजेच भांडवल करून

आपलाखिसा भरणारा माणूस

हल्लीतत्वांच्या गोष्टी करतो...

सध्याच्यायुगात एखादा हिंस्त्र प्राणीही

एखादयामाणसाचे जितके लचके काढतनाही

तितकेलचके हल्ली एक माणूस

दुसर्‍या माणसाचे काढतो...

जंगलाच्या राज्यात निदान

वाघ तरी वाघापासून सुरक्षित असतो

पण माणसांच्या जंगलात

माणूसच माणसाला घाबत असतो ...

मैत्रिच्या नावाखाली माणूस हल्ली

स्वार्थासाठी मित्रांणाच लुबाडत असतो...

आज जेंव्हा एखादा माणूस आत्मह्त्या करतो

तेंव्हा कोठेतरी त्याच्या आत्महत्येला

कारणीभूत एक माणूसच असतो...

माणूस स्वतःच स्वतःला अडकवून घेतो

धर्माच्या, नात्याच्या आणि संस्काराच्या बंधनात

आणि मग विनाकारण गुदमरतो...

प्रेम वगैरे या जगात अस्तित्वातच नाही

अस्तित्वात आहे ती गरज या गरजेलाच

आपण कदाचित प्रेम समजतो...

माणूस म्ह्णून जन्माला आल्यावर

फक्त माणूस म्ह्णूनच जगलो असतो

तर कदाचित फक्त माणूस म्ह्णून

आपण अधिक सुखी असतो...

वेडीच आहे ती!

वेडीच आहे ती!
माझ्या जाण्याच्या दिवसाची वाट पाहतीये,
उरलेला प्रत्येक क्षणनक्षण माझ्यात जगायला,
वेडी कधी दिवसात तर कधी तासात वेळ मोजतीये,
वारंवार मला आठवण करून देतीये,
माहितीये मला ती तस का करतीये!

स्पष्टपणे न तीला काही बोलवेना न मला,
डोळ्यांना मात्र कळतंय सार,
नजरेतूनच चर्चा होते हल्ली आमच्यात!

तीच्या शिवाय जगण्याच्या विचाराने,
थरकाप उडालाय माझ्या मनाचा,
भावनांचाही कडेलोट झालाय केव्हाच,
क्षण हा येणार हे दोघांनाही होते माहित,
पण तरीही मन मात्र तयार होईना निघायला!

हातात हात घेउनी, नजरेला नजर भिडवूनी,
घेताना तीचा निरोप,
होणार माझे पानिपत!

पण,
जाताना देईल तीला मी भरवसा,
असलो जरी साता-समुद्रापार तरी राहील तुझ्या मनात,
तुझ्या प्रेमाची सावली, जाणवेल मला तिथेही,
आठवशील तू प्रत्येक श्वासाला,
जाणवेल तुलाही अस्तित्व माझ,
पापणी आपली लावताना!

तिथेच असेल मी तुझ्या मनात खोलवर रुजलेला,
जाणीव…….तू मनाने सोबत असल्याची पुरवून घेईल मी स्वतःला!

वेडे विश्वास ठेव!
तुझ्या शिवायचा हा प्रत्येक क्षणही,
फक्त तुझाच असेल,
असेल तुझ्याच प्रेमात तो बहरलेला!

वाट पहा!
लवकरच परतेन मी,
तुझ्या मिठीतला स्वर्ग जगायला!!!

प्रेम कसं असावं.....

प्रेम कसं असावं
हे नाभाकडून शिकावं
बरसवून मोत्यांच्या धारा
त्याने धरणीला भिजवावं
नटवून हिरव्या शालुने
त्याने तिला सजवावं
उतरून क्षितिजावर कधीतरी
एक गोड चुंबन घ्यावं
प्रेम असं असावं .................

प्रेम कसं करावं
हे नदीकडून शिकावं
आस मिलनाची घेऊन उरी
त्याच्यासाठी दरीखोऱ्यातून धावावं
कितीही वळणं आली तरी
अखेर हृदयी सागराच्याच समवाव
प्रेम असं असावं ...

Wednesday, October 5, 2011

" आज आईचा फोन आला होता.... . आज आईचा फोन आला होता कधी येतोयस बेटा तो हळवा आवाज पुन्हा पुन्हा विचारत होता थकलेत रे डोळे आज आता तुझी वाट पाहून पाहून तुला न भेटताच हा जीव जाऊ नये वाहून तुझे बाबा पण आज मनातून तुटत आहेत पण मी मजबूत आहे असे दाखवण्याचा खोटाच प्रयत्न ते करत आहेत तुझी ताई पण तू येणा-या वाटेकडेच पाहतेय तुझा दादा येईल का तुझ्यासाठी घेतलेली राखी सुद्धा तिला विचारतेय सतत बडबडणारा तुझा भाऊ आता अबोलच असतो आई कधी येईल ग दादा अश्रुने डबडबलेला त्याचा डोळा मला विचारत असतो यांचे जाऊ दे,पण तिचे काय जिला तू वचन दिलं आहेस प्रत्येक सुख दुखात साथ देण्याचे दुखांना पळवून सुख तिच्या जीवनात भरण्याचे तिचे ओठ अबोल असले तरी तिच्या झुकलेल्या नजरा प्रश्नानाचा वर्षाव करतात आई कधी येतील हो ते नकळत च मला पुन्हा पुन्हा सवाल करतात किती कारणे सांगू तिला तुझ्या न येण्याची बघ पक्षी सुद्धा आपापल्या घरट्यात येत आहेत कारण आता वेळ आली आहे रे बेटा सर्वांच्या मिलनाची ही हाक आहे माझ्या त्या प्रत्येक हळव्या मातेची सर्व जगाचे प्रेम,माया,सुगं ध सामावलेल्या त्या प्रत्येक नाजूक आणि सुंदर फुलांची!!

Tuesday, September 27, 2011

येइल का गं तुला माझी आठवण ?

येइल का गं तुला माझी आठवण ? मी दूर गेल्यानंतर होइल का गं पापणी ओली? जुनं सारं आठवल्यानंत र भासेल का एखादी संध्याकाळ उदास एकाकी नकोशी. अन् पाहून त्या वेड्या चन्द्रास आठवेल का रात्र जागवलेली? विचारलं मी काहीसं हळवं होत अन् धरला तुझा हात अगदी घटट् तू टाकलास एक शांत कटाक्ष आणि वार्यावरती गंध पसरावा इतक्या हळूवारपणे बोललीस . . . .. . . . . . वेड्या आठवण येण्यासाठी विसरावं लागतं !!!!

एका लहान मुलाची कळवळ

लहान मुलं कधी काय विचारतील! याचा नेम नसतो, आणि त्याचं ऊत्तर आपल्याजवळ नसते असतात फक्त पाणावलेले डोळे!!!! एका लहान मुलाची कळवळ!!!... ...... बाबा सांग ना रे आई कुठे गेली ती स्विटी म्हणे तुझी आई देवाघरी गेली तिच्याकडे कशी आई आहे माझी आई कुठे गेली? बाबा सकाळी मला रडायला येतं माझ्या स्वप्नात कोणतरी येतं झोप बाळं हं प्रेमानं म्हणतं ती आईच होती अगदी तुझ्या समोरुन गेली तु थांबवलच नाही बाबा माझी आई कुठे गेली मला शाळेत कोण नेणार? मला खाऊ कोण देणार? घरी आलास, की तु झोपुन जातो हां रे तु तर थकलेला असतो तु झोपल्यावर माझ्याशी लपाछपी कोण खेळणार? खेळायला मी माझ्याशीच गट्टी केली सांग ना रे बाबा माझी आई कुठे गेली? काल मी शाळेत पडलो एकटाच खुप रडलो मीच माझे डोळे पुसले अन् स्वतःलाच बडबडलो आई असती तर तिनं उचललं असतं मी पडायला लागलो की पकडलं असतं माझे डोळे पण पुसले असते मायेनं जवळ घेतलं असतं रोज मला तिची आठवण आली सांग ना रे बाबा माझी आई कुठे गेली काल स्विटि मला रागावून म्हणाली आहे तुझी आई तर मरुन गेली आहे बाबा मरणं म्हणजे काय असतं? त्यानं आई मिळेल का? मला सुद्धा जमलं असतं मरुन आईची नक्की भेट झाली असती? मी बर्थ डे ला हीच wish मागितली असती बाबा संगळ काही दिलं तुम्ही ही wish पुर्ण नाही केली सांग ना रे बाबा माझी आई कुठे गेली..

का बरं मला तुझी आठवण यावी...?

का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी.... ?
सारं काही जवळ असुनही,
दूर असल्याची जाणीव व्हावी.... .?
आठवतेय तो सारा पसारा,
जो पसरलाय सैरावैरा,
त्यातूनच तुझा तो इशारा,
तेव्हा अंगावर आलेला शहारा...,
वाटतं ही वेळ अशी, चुटकित सरून जावी,
आणि शेवटी कायमची, आपली गाठभेट व्हावी.... ...!

"जरा ऐक ना, काहीसांगाय चे आहे तुला...... . ♥,

♥"जरा ऐक ना, काहीसांगाय चे आहे तुला...... . ♥, तुला भेटताना... .... होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला, तुला पाहताना... ....... हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला, तुझ्या बरोबर चालताना... ........ हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला, तू सोबत असताना.... ... सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला, ... तू नसताना.... ....... तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला, तुज्या बरोबर बोलताना... ...... होणारी शब्दांची धडपड ऐकवायची आहे तुला, तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा...... .. हे सांगायचे आहे तुला, तुझ्या बद्दल माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत तुला...... ...प्रेमात ील नाजूक भावना